Chatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 Wishes (Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes In Marathi)
प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना मेसेजेस च्या माध्यमातून तुम्ही खास मराठी शुभेच्छा देऊ शकता.
Chatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 Wishes
तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
|| जय शिवराय ||
"प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी.
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा"
तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याने स्वतःसाठी एकही
राजवाडा महल नाही बांधला
तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त मित्रांना शिव-शुभेच्छा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा….
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
श्वासात रोखूनी वादळ,
डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
"मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले
जीवन अर्पण करणारे
अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा"
"कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा,
कोणी दुखावले असेल तर त्याला सुखाची वाट दाखवा,
जग जिंकायचं असेल तर उदाहरण शिवाजी महाराजांचे द्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा"
"ताठ होतील माना..
उंच होतील नजरा...
या रयतेच्या राजाला..
मानाचा मुजरा."
"यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा"
" 'शिवाजी' या नावाला कधी
उलट वाचले आहे का?
'जीवाशी' असा शब्द तयार होतो.
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय!
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा"
कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती शिवाजी राजा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
थोर तुझे उपकार जाहले,
सुर्य तेजात चांदने नाहले,
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले,
आठवुन तुझ्याशिवशाहीला,
अश्रु माझे ईथेच वाहले …
!! जय_शिवराय_जय_शिवशाही
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
राजा छत्रपती
जय शिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
ही शिवाजी महाराजांची शिकवण
जय भवानी जय शिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
जय जिजाऊ जय शिवराय
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
योगीराज श्रीमंत
छत्रपती शिवाजी महाराज की जय
सर्व शिवभक्तांना
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
स्वराज्यासाठी ज्याने वेचले आपले आयुष्य
पूर्ण स्वराज्य हे एकच होते ज्याचे लक्ष्य
स्वराज्याचे स्वप्न केले ज्यांनी साकार
शिवजयंती दिनी करु त्या शिवछत्रपतींचा जयजयकार
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!