Sant Sevalal Maharaj Jayanti 2024 Wishes in Marathi : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारे शुभेच्छा संदेश

Sant Sevalal Jayanti 2024 Wishes in Marathi

Sant Sevalal Jayanti 2024 Wishes in Marathi : नमस्कार मित्रानो प्रत्येक वर्षी १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज याची जयंती संपूर्ण भारतात उत्साहाने साजरी केली जाते, क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज याचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला, आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते, संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. शूरवीर लढवय्या बंजारा समाजाचे सतगुरू आहे. संत सेवालाल महाराज यांनी समाजाला अनेक प्रेणदायी संदेश दिले जे कि आज हि समाजाला प्रेणदायी ठरतात .

संत सेवालाल महाराज याच्या जयंती निमित्त खाली दिलेल्या शुभेच्छा संदेश आपण आपल्या मित्र परिवार मध्ये शेअर करू शकता. 

Sant Sevalal Jayanti 2024 Wishes in Marathi 

बंजारा समाजाचे दैवत, थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन !
॥ जय सेवालाल ॥
एक तांडेर एक नायक ,
वो तांडेर वू नायक
एक तांडेर एक नायक
वो तांडेर वू नायक
पण सारेती मोठो
एकच नायक
सेवालाल नायक

सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !

मनेम सेवालाल

दिलेंम सेवालाल

आंखीम सेवालाल

जगेम सेवालाल

सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा ! 

केरी तू निदा मत कर

केरी तू ईर्षा मत कर

अच्छे वाटेप चाल तू

ध्येय तू हासील तू कर

सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा ! 

जग काई कच, काई करच,

येर विचार तू मत कर ,

जे तोन आचो वाटच , खरं वाटच ,

वुच तू कर

सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा ! 

राठोड तू, पवार तू, चव्हाण तू,जाधव तू , वेगवेगळो तारो नाम

वेगवेगळो तारो गोत्र

पण १५ फेब्रुवारी न हेजावोचो तम् सारी एकत्र

सेवालाल महाराज जयंती निमित्त हार्दिक

शुभेच्छा !

सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 

बंजारा समाजेर कुलदेवत राजाधीराज महान शूरवीर

सेवालाल महाराज येणूर जयंती निमित्त भारतेर सारी

गोर भाईउन कळजेर काटे कंती सेवा शुभेच्छा…  

गोर बोली पर करो प्रेम गोर बोली बाप- दादार देन भुला

जाय गोर बोली तो वळकावा कोनी गोर केन

सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व गोर बांधवाना

सेवा शुभेच्छा 


संत सेवालाल महाराज यांनी मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध‌ लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून‌ प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली.

संत सेवालाल महाराज यांची शिकवण

- जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा, जंगल तोड करू नका.

- सर्व व्यक्ती मानव हे सामान आहे, कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका.

- सन्मानाने आयुष्य जगा.

- मुक्या प्राणीमात्रास इजा करु नका, इतरांशी वाईट बोलू नका.

- प्रत्येक स्त्रियांचा सन्मान करा, आणि मुली जिवंत देवी आहेत.

- समस्या ची काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड दया, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा.

- पाणी वाचवा आणि तहानलेल्यांना पाणी द्या आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका जे सर्वात मोठे गुन्हा / पाप आहे.

- वडीलधारी जेष्ठ व्यक्तीचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा.

- जंगल नष्ट करू नका, जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करीत आहात.

- मनन केल्याने आंतरिक शांती मिळेल, आणि अभ्यास करा, ज्ञान मिळवा आणि ज्ञान इतरांना वाटा.

- माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे, माणुसकीवर प्रेम करा.

- आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा.

- कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करु नका.

- धैर्य मानवतेच्या शिस्त, चिंतनशील आणि एक बुद्धीप्रामाण्यवादी संत होते. अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून मार्ग काढण्यासाठी सदोदित मार्गदाता म्हणून आजीवन भूमिका केली.
------------------------------------------------------------------




Previous Post Next Post
close